Mahatma Jyotiba Phule Research & Training Institute
(MAHAJYOTI)

(An Autonomous Institute of The Other Backward Class Bahujan Welfare Department, Govt. of Maharashtra)

Pre-Examination Training for Combined Group B and C Services Exam Conducted by MPSC

  • प्रशिक्षणाचे स्वरूप :महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात येणाऱ्या संयुक्त गट (ब व क)परीक्षेतील पूर्व व मुख्य परीक्षेचे ६ महिने पूर्व प्रशिक्षण देण्यात येते. 
  • लाभाचे स्वरूप : 
  1. मोफत प्रशिक्षण 
  1. विद्यावेतन: दरमाह ७५% हजेरी असल्यास रु.१०,०००/- 
  1. आकस्मिक निधी : एकवेळ रु.१२,०००/- 
  • पात्रता निकष : 
  1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा. 
  1. उमेदवार हा नॉन क्रिमीलेअर गटातील असावा. 
  1. उमेदवाराने पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. 
  • अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे : 
  1. ओळखपत्र – आधारकार्ड 
  1. जात प्रमाणपत्र 
  1. वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र 
  1. आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे 
  • प्रशिक्षणासाठी निवड पद्धती: 
  1. प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात. 
  1. विद्यार्थ्यांची निवड परीक्षा घेऊन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची मिरीट व प्रवर्ग निहाय आरक्षणानुसार अंतिम निवड करण्यात येते.