Mahatma Jyotiba Phule Research & Training Institute
(MAHAJYOTI)
(An Autonomous Institute of The Other Backward Class Bahujan Welfare Department, Govt. of Maharashtra)
मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण
- प्रशिक्षणाचे स्वरूप : भारतीय सैन्य दल, केंद्रीय पोलीस सेवा यांचेमार्फत घेण्यात येणाऱ्या मिलिटरी भरती परीक्षेचे ६ महिने प्रशिक्षण हे पुणे येथील नामांकित संस्थांमध्ये देण्यात येते.
- निर्धारित वार्षिक जागा : १५००
- लाभाचे स्वरूप :
- मोफत प्रशिक्षण
- विद्यावेतन: दरमाह ७५% हजेरी असल्यास रु.१०,०००/-
- आकस्मिक निधी : एकवेळ रु.१२,०००/-
- पात्रता निकष :
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा.
- उमेदवार हा नॉन क्रिमीलेअर गटातील असावा.
- उमेदवाराने १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
- वयोमर्यादा : १७ ते १९ वर्षे.
- किमान उंची १५७ से.मी. (पुरुषांकरिता), १५२ से.मी. (महिलांकरिता),
- छाती (फक्त पुरुषांकरिता): किमान ७७ से.मी. व दीर्घश्वास घेतल्यावर ८२ से.मी.
- अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड
- जात प्रमाणपत्र
- वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
- आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
- प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:
- प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
- विद्यार्थ्यांची निवड परीक्षा घेऊन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची मिरीट व प्रवर्ग निहाय आरक्षणानुसार अंतिम निवड करण्यात येते.