Mahatma Jyotiba Phule Research & Training Institute
(MAHAJYOTI)
(An Autonomous Institute of The Other Backward Class Bahujan Welfare Department, Govt. of Maharashtra)
महाज्योतीच्या लाभार्थीची यशोगाथा
महाज्योती मार्फत महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास – प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात समान संधी प्राप्त व्हावी या हेतूने पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण, JEE/NEET/MHT-CET, MPSC, UPSC आदी स्पर्धात्मक परीक्षांचे प्रशिक्षण देण्यात येते. उमेदवारांना रोजगाराची संधी मिळावी या करिता कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येते तसेच विविध संशोधन कार्याला प्रोत्साहन मिळावे याकरिता पीएचडी करणाऱ्या उमेदवारांना अधिछात्रवृत्ती प्रदान करण्यात येते.
महाज्योतीच्या योजनेचा आपण लाभ घेतलेला आहे. आता इतरांनाही महाज्योतीबाबत आणि महाज्योतीच्या योजनांबाबत माहिती करून देण्याचे आपणास आवाहन करण्यात येत आहे. यासाठी दिलेल्या खालील लिंकवर क्लिक करा. दिलेल्या सूचनांचे पालन करा. आपला फोटो अपलोड करा. प्रोसीड झाल्यानंतर जी इमेज तयार होईल ती इमेज आपल्या सोशल माध्यमांवर शेयर करु शकता. प्रोफाईल पिक, डिपी म्हणून ठेवू शकता. या माध्यमातून अधिकाधिक विद्यार्थांना महाज्योतीच्या योजनांचा लाभ घेण्यास प्रेरित करू शकता.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वसा चालवण्यासाठी आमच्यासह प्रतिबध्द व्हा!