Mahatma Jyotiba Phule Research & Training Institute
(MAHAJYOTI)

(An Autonomous Institute of The Other Backward Class Bahujan Welfare Department, Govt. of Maharashtra)

तेलबिया (करडई) उत्पादन, प्रक्रिया व विक्री कार्यक्रम (२०२१)

तेलबिया उत्पादन व प्रक्रिया उद्योगात असनारी संधी विचारात घेऊन व शासनाच्या खाद्यतेल धोरणात अनुसरून महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर मार्फत इतर मागास वर्गीय , विमुक्त भटक्या जाती जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रीमिलेयर गटातील शेतकऱ्या करीता तेलबिया उत्पादन व प्रक्रिया प्रकल्प रब्बी २०२१ च्या हंगामात चंद्रपूर , गडचिरोली,नागपूर,वर्धा,अमरावती ,अकोला वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातील ३ क्लस्टर द्वारे राबविण्यात येत आहे. सदर योजनेची थोडक्यात रूपरेषा खालील प्रमाणे आहे.
• राज्य शासनाचा कृषी विभाग ,कृषी विज्ञान केंद्र व शेतकरी उत्पादन कंपन्या मार्फत करडई पीक घेण्याकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येईल.
• सदर योजनेंतर्गत करडई पीक घेणाऱ्या शेतकऱ्याला महाज्योती मार्फत मोफत बियाणे पुरविण्यात येईल.तसेच खते,कीटकनाशके,जीवाणू खते व इतर लागवडी खर्च इत्यादी करीता DBT पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रु.२२००/- प्रती एकरी चे अर्थसहाय्य जमा करण्यात येईल .
• शेतकऱ्यांकडून तयार करडई उत्पादनाचे जानेवारी – फरवरी २०२२ मध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमाने टॅक्टर, माउंटेड हारवेस्टर लाऊन काढणी व मळणी करण्यात येईल त्याकरिता लागणारा अंदाजित खर्च प्रती एकर रु.८०० ते १००० शेतकऱ्याला स्वतः करावा लागेल.
• या योजनेंतर्गत शेतकऱ्याने उत्पादीत केलेली करडई (तेलबिया) महाज्योती, नागपूरद्वारे शासनाच्या सन २०२१ करिता मंजूर आधारभूत दराने खरेदी करण्यात येईल या करीता आवश्यक करारनामा शेतकऱ्याने पेरानिच्या वेळेस करून द्यावा लागेल.
• उत्पादीत मालाची वाहतूक ही जवळील फार्मर प्रोडुसर कंपनीच्या प्रक्षेत्रावर केली जाईल शेतकऱ्यांना त्यांनी उत्पादीत केलेला करडई तेलबिया जवळील फार्मर प्रोडुसर कंपनी किवा महाज्योती ठरवेल. त्या ठिकाणी स्वखर्चानी महाज्योतीच्या खरेदी केंद्रावर आणून द्याव लागेल .करडई खरेदी नंतर त्यांची वाहतूक , साठवण ,तेल काढणे,तेलाचे ग्रेडिंग (प्रतवारी) पेकेजिंग इत्यादी सर्व कामे महाज्योतीकडून करण्यात येईल.
• उत्पादित तेलाची विक्री करून प्राप्त होणारा निव्वळ नफा ह्या योजनेत सहभागी शेतकऱ्यांना त्यांनी उत्पादित केलेल्या करडई बियांच्या प्रमाणात प्रो राटा तत्वावर शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे.
• सदर योजनेंतर्गत तेलबिया उत्पादन ते तेलबिया विक्रीचा संपूर्ण प्रक्रियेमध्ये महाज्योती नागपूर तेलबिया संशिधान केंद्र डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला शासनाचा कृषी विभाग शेतकरी उत्पादक कंपन्या व कृषी विज्ञान केंद्र या यंत्रणा सहभागी राहतील .