Mahatma Jyotiba Phule Research & Training Institute
(MAHAJYOTI)

(An Autonomous Institute of The Other Backward Class Bahujan Welfare Department, Govt. of Maharashtra)

मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण

प्रशिक्षणाचे स्वरूप : भारतीय सैन्य दल, केंद्रीय पोलीस सेवा यांचेमार्फत घेण्यात येणाऱ्या मिलिटरी भरती परीक्षेचे ६ महिने प्रशिक्षण हे पुणे येथील नामांकित संस्थांमध्ये देण्यात येते.

 

  • लाभाचे स्वरूप :
  1. मोफत प्रशिक्षण
  2. विद्यावेतन: दरमाह ७५% हजेरी असल्यास रु.१०,०००/-
  3. आकस्मिक निधी : एकवेळ रु.१२,०००/-
  • पात्रता निकष :
  1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमी लेअर गटातील असावा.
  2. उमेदवाराने 10 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
  3. किमान उंची १५७ से.मी. (पुरुषांकरिता), १५२ से.मी. (महिलांकरिता),
  4. छाती (फक्त पुरुषांकरिता): किमान ७७ से.मी. व दीर्घश्वास घेतल्यावर ८२ से.मी.
  5. वयाची अट : १७ ते 1९ वर्षे
  • अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
  1. ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड
  2. जात प्रमाणपत्र
  3. वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
  4. आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
  • प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:
  • प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
  • प्राप्त अर्जांची छाननी करून उमेदवारांची निवड परीक्षा घेण्यात येते.
  • निवड परीक्षेमध्ये प्राप्त गुणांकानुसार व सामाजिक प्रवर्ग टक्केवारी नुसार उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येते.