

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)
(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

Latest News
महाज्योती मार्फत राबविण्यात येणाऱ्या कर्मचारी निवड आयोग (SSC-CGL), महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (MES) व IBPS-PO/Banking/LIC/Railway/AAO परीक्षा पुर्व ऑनलाईन प्रशिक्षणांकरीता अर्ज करण्यास मुदतवाढ देणेबाबत
महाराष्ट्र शासनाच्या सर्वंकष धोरणाअंतर्गत सन 2025-26 मध्ये घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेकरीता (CET) ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ देणेबाबत
Application for JEE/NEET/MHT-CET 2025-27 Training
JEE/NEET/MHT-CET पूर्व प्रशिक्षण
प्रशिक्षणाचे स्वरूप : अभियांत्रिकी तसेच वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात प्रवेश मिळण्यासाठी १८ महिने JEE/NEET/MHT-CET चे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येते.
- लाभाचे स्वरूप :
- मोफत प्रशिक्षण
- विद्यार्थ्यांना मोफत Tablet
- प्रतिदिवस ६ जीबी इंटरनेट सेवा
- पात्रता निकष :
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमी लेअर गटातील असावा.
- उमेदवाराने १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे शहरी भागातील विद्यार्थ्यांना किमान ७०% टक्के गुण असावेत तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना किमान ६०% टक्के गुण असावेत.
- विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा.
- अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड
- जात प्रमाणपत्र
- वैध नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र
- आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:
- प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
- प्राप्त अर्जांची छाननी करून १० ला प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे व संवर्गनिहाय तसेच समांतर आरक्षणानुसार उमेदवारांची निवड करण्यात येते