

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)
(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

Menu
JEE/NEET परीक्षांकरिता तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तक संच वाटप
- प्रशिक्षणाचे स्वरूप : महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्याथ्यांना JEE/NEET परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरीता तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत JEE/NEET परीक्षेचे पुस्तक संच वाटप करण्यात येते.
- निर्धारित वार्षिक जागा : ८००० (JEE करिता ४००० व NEET करिता ४०००)
- पात्रता निकष :
- विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा असावी.
- विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा असावी तसेच विद्यार्थी नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा असावी.
- 10 वी ची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर योजनेच्या लाभाकरीता पात्र राहतील.
- विद्यार्थी हा 11 वी मध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. या बाबतची कागदपत्रे स्पष्ट व दुष्य पद्धतीने जोडणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्यांची निवड ही इयत्ता 10 वी च्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आक्षणानुसार करण्यात येईल.
- इयत्ता 10 वी मध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांकरीता 70% किंवा यापेक्षा जास्त तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरीता 60% किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे किंवा कसे हे विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड वरील नमुद पत्त्यावरुन ठरविल्या जाईल.
- अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड (पुढील व मागील बाजुसहित)
- रहिवासी दाखला (Domicile Certificate)
- जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
- वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate)
- 10 वी ची गुणपत्रिका
- 11 वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला (बोनाफाईट सर्टिफिकेट)
- दिव्यांग असल्याचा दाखला
- अनाथ असल्याचा दाखला
- आरक्षण :
सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे :
अ क्र. | सामाजिक प्रवर्ग | टक्केवारी |
1. | इतर मागास वर्ग (OBC) | 59% |
2. | विमुक्त जाती – अ (VJ-A) | 10% |
3. | भटक्या जमाती – ब (NT-B) | 8% |
4. | भटक्या जमाती – क (NT-C) | 11% |
5. | भटक्या जमाती – ड (NT-D) | 6% |
6. | विशेष मागास प्रवर्ग (SBC) | 6% |
एकूण | 100% |
समांतर आरक्षण पुढील प्रमाणे :
- प्रवर्गनिहाय महिलांसाठी ३०% जागा आरक्षित आहे.
- दिव्यांगाकरीता ५% जागा आरक्षित आहे.
- अनाथांसाठी १% जागा आरक्षित आहे.
- प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:
- प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
- प्राप्त अर्जांची छाननी करून १० वी ला प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे मिरीट व प्रवर्ग निहाय आरक्षणानुसार अंतिम निवड करण्यात येते.