महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

Application for MHT-CET/JEE/NEET - 2025 Training

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती),नागपूर मार्फत JEE/NEET/MHT-CET करिता १० वी नंतर प्रशिक्षण देण्यात येते. सदरचे प्रशिक्षण हे दोन वर्षासाठी असून त्यासाठी विद्यार्थ्यांना मोफत Tab व दररोज ६ जीबी डेटा देण्यात येतो. १० वी उत्तीर्ण झालेल्या व विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना महाज्योतीच्या JEE/NEET/MHT-CET प्रशिक्षणाचा लाभ होणार आहे. या करिता महाज्योती संस्थेने इच्छुक उमेदवारांना दि. ०५ जुलै २०२३ पर्यत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याने विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा, विद्यार्थी हा इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा. तसेच तो नॉनक्रिमिलेअर गटातील असावा. योजनेच्या संदर्भातील सर्व अटी व शर्ती या महाज्योतीच्या www.mahajyoti.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या असून विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या संकेतस्थळावरील सूचना फलकात जाऊन प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी केले आहे.
तसेच ज्या उमेदवारांनी या आधी JEE/NEET/MHT-CET प्रशिक्षणासाठी अर्ज केलेले आहेत मात्र कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही अश्या उमेदवारांना त्यांचे आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी दि.१५ जुलै २०२३ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. ज्या उमेदवारांनी कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही अश्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन देखील महाज्योती मार्फत करण्यात आलेले आहे.