महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

कौशल्य विकास

महाज्योती,नागपूर मार्फत “कौशल्य विकास प्रशिक्षण व रोजगार”

कौशल्य विकासातून रोजगार !!

रोजगारातून स्वावलंबन !! स्वावलंबनातून आत्मसन्मान !!!

  महाराष्ट्र शासनाच्या महाज्योती, नागपूर या स्वायत्त संस्थेमार्फत नागपूर महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागासप्रवर्गातील 18 ते 45 वयोगटामधील तसेच नॉनक्रिमीलेअर गटातील युवक-युवतींनी निवासी व अनिवासी स्वरूपाचे विविध क्षेत्रातील मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पात महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागासप्रवर्गातील बेरोजगार युवक-युवतींना नामवंत प्रशिक्षण संस्थांमधून विविध टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल कोर्सेसचे प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या युवक-युवतींना रोजगाराच्या (Placements) विविध संधी उपलब्ध करून देण्यात येतात.

नोंदणीकरिता आवश्यक पात्रता :

1. उमेदवार व्यक्ती ही महाराष्ट्राची रहिवासी असावी.
2. उमेदवार व्यक्ती ही इतर मागासवर्ग/ विमुक्त जाती व भटक्या जमाती /विशेष मागासप्रवर्ग गटातील असावी.
3. उमेदवार व्यक्ती ही नॉनक्रिमीलेअर गटातील असावी.
4. उमेदवार व्यक्तीने कौशल्य विकास प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण केलेली असावी.
5. उमेदवार व्यक्तीची कोणत्याही ठिकाणी रोजगार करण्याची तीव्र इच्छा असावी.

सध्यस्थितीत महाज्योती मार्फत राबविण्यात येणारे कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम :

Sr No

Name of Courses

Educational Criteria

Age

Duration in Hrs

1

EMS Technician

12th

18 to 45

400

2

Technical Support Engineer

12th

18 to 45

400

3

Retail Sales Associate

10th

18 to 45

250

4

Inventory Clerk

12th

18 to 45

280

5

Machine Operator-Plastic Processing (MO-PP)

8th

18 to 28

960

6

Machine Operator-Injection Moulding (MO-IM)

8th

18 to 28

960

7

Machine Operator-Tool Room (MO-TR)

10th/ITI/Diploma

18 to 28

960

8

Machine Operator & Programmer-(CNC Lathe)

10th/ITI/Diploma

18 to 28

960

9

Machine Operator & Programmer-(CNC Miling)

10th/ITI/Diploma

18 to 28

960

10

Maintenance Of Machinery -Technician

10th/ITI/Diploma

18 to 28

960

11

General Duty Assistant

10th

18 to 45

420

12

Emergency Medical Technician

12th

18 to 45

360

13

Home Health Aid

10th

18 to 45

360

15

Warehouse Supervisor

Any Diploma

18 to 45

240

16

CRM Domestic Voice

10th

18 to 45

400

17

Web Developer

12th

18 to 45

400

उमेदवारांनी पुढीलप्रमाणे नोंदणी करावी :

महाज्योती, नागपूर कार्यालयाच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावरील नोटीस बोर्ड मधील “कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम 2021 – नोंदणी अर्ज” यावर नोंदणी करावी. मुदतीनंतर नोंदणी करता येणार नाही. नोंदणी केलेल्या उमेदवारांची मुलाखत घेऊनच अंतिम निवड करण्यात येईल.निवडीबाबतचे अंतिम अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती, नागपूर यांना राहतील.

मोफत, निवासी प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

इतर मागास वर्ग (OBC), विशेष मागास वर्ग (SBC), विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJ-NT) समाजाच्या नॉन क्रिमीलेयर गटाच्या उमेदवारासाठी विनामुल्य, निवासी, पूर्णवेळ कौशल्य प्रशिक्षणाची सुवर्ण संधी.

सस्नेह नमस्कार,
महात्मा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपुर व इंडो जर्मन टूल रूम (आय जी टी आर) औरंगाबाद यांच्या द्वारे, महाराष्ट्र राज्यातील इतर मागास वर्ग (OBC), विशेष मागास वर्ग (SBC), विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJ-NT) समाजाच्या नॉन क्रिमीलेयर गटातील, सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतीं साठी विनामूल्य, निवासी, पूर्णवेळ प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षणासाठी किमान वयोमर्यादा 18 ते 35 वर्ष, प्रशिक्षणाचा कालावधी बारा/सहा माहिने तसेच किमान शैक्षणिक पात्रता दहावी, बारावी, आय टी आय, अभियांत्रिकी डिप्लोमा/डिग्री आहे.
सदर प्रशिक्षणचे आयोजन इंडो जर्मन टूल रूम औरंगाबाद येथे करण्यात आलेले आहे. गरजूनीं नाव नोंदणी करून आपला प्रवेश निश्चित करावा. अधिक माहिती साठी सोबत ची जाहिरात पहा (अर्ज भरणे सुरू आहे) व नोंदणी साठी या रजिस्ट्रेशन लिंक वर क्लिक करा
https://forms.gle/sy8DZHC55qQZ1vKM8
या संदर्भात अधिक माहिती साठी खालील वेबसाईटवर किंवा पत्त्यावर संपर्क साधावा.
कृपया हि माहिती जास्तीत जास्त गरजू लोकापर्यंत व विविध समूहावर (ग्रुप) पाठवावी हि विनंती.
शुभेच्छांसह,

प्रशिक्षण विभाग
एम एस एम ई टेक्नॉलॉजी सेंटर
इंडो जर्मन टूल रूम, औरंगाबाद
पी-३१, एम आय डी सी चिकलठाणा,
औरंगाबाद-431006 (म.रा.)
Website: http/www.igtr-aur.org Mob: 9373161252, 9373161253