महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

पीएचडी करिता अर्थसहाय्य योजना

  • योजनेचे स्वरूप : भारतातील यु.जी.सी.मान्यताप्राप्त विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, महाविद्यालयात पूर्ण वेळ पीएचडी करण्यासाठी महाज्योतीमार्फत जास्तीत जास्त ५ वर्षे अर्थसहाय्य करण्यात येते.
  • निर्धारित जागा : २००
  • अर्थसहाय्याचे स्वरूप :
Fellowship in Humanities, Social Sciences, Sciences Engineering & Technology

 

Ph.D.

@ Rs. 37,000/-p.m. for 1st & 2nd year(MJPJRF)
@ Rs. 42,000/- p. m. for 3rd, 4th& 5th year subject to providing upgradation certificate.(MJPSRF)
Contingency A,@ Rs. 10000/- p.a. for initial 1st & 2nd yearHumanities & Social Sciences
@ Rs. 20500/- p.a. for 3rd, 4th, & 5th year
Contingency B@ Rs. 12000/- p.a. for initial 1st & 2nd yearSciences, Engg. & Technology
@ Rs. 25000/- p.a. for 3rd, 4th, & 5th year
Escorts / Reader assistance@ Rs. 2000/- p.m. in case of physically handicapped & blind (दिव्यांगजन) candidatesFor all disciplines
HRAAs per Govt. norms (10%, 20%, 30%)For all disciplines

 

  • पात्रता निकष :
  1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमी लेअर गटातील असावा.
  2. उमेदवाराने भारतातील यु.जी.सी.मान्यताप्राप्त विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, महाविद्यालयात पूर्ण वेळ पीएचडी करण्यासाठी कायमस्वरूपी नोंदणी केलेली असावी.
  3. वयोमर्यादा : कमाल ४५ वर्षे.
  • अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
  1. ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड
  2. जात प्रमाणपत्र
  3. वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
  4. आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
  5. यु.जी.सी.मान्यताप्राप्त विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, महाविद्यालयात पूर्ण वेळ पीएचडी करण्यासाठी कायमस्वरूपी नोंदणी प्रमाणपत्र.
  • निवड पद्धती:
  1. प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
  2. प्राप्त अर्जांची छाननी करून उमेदवारांची निवड परीक्षा घेण्यात येऊन अंतिम निवड करण्यात येते.

टीप : महात्मा ज्योतिबा संशोधन अधिछात्रवृत्ती करिता सविस्तर मार्गदर्शक सूचना या महाज्योतीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.