महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )
Latest News
महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त गट ब व क परीक्षा पूर्व प्रशिक्षण २०२५-२६ करीता दुसरी प्रतिक्षा यादी व प्रशिक्षण संस्थेत रुजू होण्याकरिता विद्यार्थांना सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा), संघ लोकसेवा आयोग महाराष्ट्र येथील प्रशिक्षण तसेच भटक्या जमाती क प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र व संघ लोकसेवा आयोग परीक्षा पूर्व प्रशिक्षण २०२५- २६ करिता निवड यादीतील प्रवेश रद्द करण्यात आलेल्या विद्यार्थांची यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (संयुक्त गट ब व क) परीक्षा पूर्व प्रशिक्षण २०२५-२६ करिता निवड झालेल्या विस्तारित यादीतील विद्यार्थांची संस्था निहाय यादी व प्रशिक्षण संस्थेत रुजू होण्याकरिता सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा) परीक्षा पूर्व प्रशिक्षण २०२५-२६ करिता निवड झालेल्या विस्तारित यादीतील विद्यार्थांची संस्था निहाय यादी व प्रशिक्षण संस्थेत रुजू होण्याकरिता सूचना संघ लोकसेवा आयोग महाराष्ट्र येथील परीक्षा पूर्व प्रशिक्षण २०२५-२६ करिता निवड झालेल्या विस्तारित यादीतील विद्यार्थांची संस्था निहाय यादी व प्रशिक्षण संस्थेत रुजू होण्याकरिता सूचना.

सेल्फी विथ टॅब

महाज्योती मार्फत महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास – प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात समान संधी प्राप्त व्हावी या हेतूने पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण, JEE/NEET/MHT-CET, MPSC, UPSC आदी स्पर्धात्मक परीक्षांचे प्रशिक्षण देण्यात येते. उमेदवारांना रोजगाराची संधी मिळावी या करिता कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येते तसेच विविध संशोधन कार्याला प्रोत्साहन मिळावे याकरिता पीएचडी करणाऱ्या उमेदवारांना अधिछात्रवृत्ती प्रदान करण्यात येते.

महाज्योतीच्या अंतर्गत JEE/NEET/MHT-CET परिक्षा पूर्व प्रशिक्षण या योजनेत टॅब मिळाला असून आता इतरांनाही महाज्योतीबाबत आणि महाज्योतीच्या योजनांबाबत माहिती करून देण्याचे आपणास आवाहन करण्यात येत आहे. यासाठी दिलेल्या खालील लिंकवर क्लिक करा. दिलेल्या सूचनांचे पालन करा. आपला फोटो अपलोड करा. प्रोसीड झाल्यानंतर जी इमेज तयार होईल ती इमेज आपल्या सोशल माध्यमांवर शेयर करु शकता. प्रोफाईल पिक, डिपी म्हणून ठेवू शकता. या माध्यमातून अधिकाधिक विद्यार्थांना महाज्योतीच्या योजनांचा लाभ घेण्यास प्रेरित करू शकता.

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वसा चालवण्यासाठी आमच्यासह प्रतिबध्द व्हा!