

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)
(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

मातोश्री मुलींचे शासकीय वसतिगृह, नाशिक
शासन निर्णय क्रमांकः वसति ५३१७/प्र.क्र.९/मशि-२ दिनांक १८ ऑक्टोबर, २०२२ अन्वये मातोश्री मुलींचे शासकीय वसतिगृह, सरस्वती नगर, घात्रक फाटा, पंचवटी, नाशिक, येथे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी, पुणे यामार्फत मराठा, कुणबी, मराठा- कुणबी व कुणबी-मराठा लक्षीत गटातील ७५ मुलींसाठी व महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती, नागपुर यामार्फत इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या गटातील ७५ मुलींसाठी तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभाग मार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ५० मुलींसाठी अशा प्रकारे लक्षित घटकातील एकूण २०० मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्यात आलेले आहे.
- निवड निकष :
- मातोश्री मुलींच्या वसतीगृहात प्रवेश देताना सामाजिक प्रवर्ग निहाय जागा विचारात घेऊन व कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या मुर्लीनाच प्रवेश देण्यात येईल.
- निर्धारित जागांपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास जागा भरताना प्रथम प्राधान्य हे व्यावसायिक पदवी (जसे की, वैद्यकीय, अभियांत्रिकी, विधी, वास्तुशास्त्रज्ञ, कृषी आदी) द्वितीय प्राधान्य हे बिगर व्यावसायिक पदवी (विज्ञान, वाणिज्य, कला आदी).
- व्यावसायिक पदवी अंतर्गत मर्यादेपेक्षा जास्त अर्ज असल्यास प्रथम प्राधान्य हे व्यावसायिक पदवीतील पदव्युत्तर पदवी त्यानंतर पदवी, त्यानंतर पदविका व त्यानंतर ITI व तत्सम शिक्षण घेणाऱ्या मुलींना देण्यात येईल. जास्त अर्ज आल्यास मागील वर्षी ज्या मुलींना जास्त गुण होते त्या आधारावर गुणांनुसार प्राधान्य देण्यात येईल. ज्या ठिकाणी समान गुण असतील त्या ठिकाणी वयोमानानुसार जेष्ठता विचारात घेण्यात येऊन त्या मुलींना प्राधान्य देण्यात येईल.
- बिगर व्यावसायिक पदवी अंतर्गत मर्यादेपेक्षा जास्त अर्ज असल्यास प्रथम प्राधान्य हे बिगर व्यावसायिक पदवीतील पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या मुर्लीना देण्यात येईल, जास्त अर्ज आल्यास मागील वर्षी ज्या मुलींना जास्त गुण होते त्या आधारावर गुणांनुसार प्राधान्य देण्यात येईल. ज्या ठिकाणी समान गुण असतील त्या ठिकाणी वयोमानानुसार जेष्ठता विचारात घेण्यात येऊन त्या मुलींना प्राधान्य देण्यात येईल.
- प्रवेशासाठी अर्ज केला याचा अर्थ प्रवेश निश्चित झाला असा होणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
- मातोश्री मुलींच्या वसतीगृहात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुलींनी शासनाच्या इतर वसतीगृह योजनेचा याआधी लाभ घेतलेला नसावा किंवा वसतिगृह ऐवजी देण्यात येणाऱ्या आर्थिक सहाय्य योजनेचा लाम घेतलेला नसावा.
- आवश्यक कागदपत्रे :
१. विद्यार्थ्यांचे आधारकार्ड झेरॉक्स
२. विद्यार्थ्यांचे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
३. जात प्रमाणपत्र
४. गुणपत्रिका
५. पालकांचा उत्पन्नाचा दाखला
६. रहिवासी दाखला
७. बैंक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
८. शाळा सोडल्याचा दाखला
९. बोनाफाईड/शैक्षणिक शुल्क भरणा पावती