"महाज्योती" चा मुख्य उद्देश इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागासवर्ग या घटकांसाठी विविध विधायक उपक्रम राबवुन त्यांचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. अशा उद्दात हेतूस साजेसे बोधचिन्ह (Logo) आणि बोधवाक्य (Tagline) निर्माण करण्याकरीता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमधील स्पर्धक हे स्वतंत्रपणे काम करणारे डिझायनर, डिझाइन कंपनी, विद्यार्थी व सामान्य नागरिक यापैकी होते.
स्पर्धेचा निकाल महाज्योती तर्फे घोषित करण्यात आला आहे. स्पर्धेमधील विजेत्यांची नावे खालील प्रमाणे आहे:
प्रथम क्रमांक: श्री. धीरज भीमराव मनवर, आर्वी, जि. वर्धा द्वितीय क्रमांक: श्री. योगेश नामदेव बाराहाते, विठ्ठल नगर, नागपूर तृतीय क्रमांक: कु. वैष्णवी गणेश देवल, म्हाळगी नगर, नागपूर