1200px-Emblem_of_India.svg

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

बोधचिन्ह आणि बोधवाक्य स्पर्धा

महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर ही स्वायत्त संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. या स्वायत्त संस्थेचा मुख्य उद्देश इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागासवर्ग या घटकांसाठी विविध विधायक उपक्रम राबवुन त्यांचा सर्वांगीण विकास करणे हा आहे.

अशा उद्दात हेतूस साजेसे बोधचिन्ह (Logo) आणि बोधवाक्य (Tagline) निर्माण करण्याकरीता राज्यातून उत्स्फुर्तपणे स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन समस्त जनतेला महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर कडून करण्यात येत आहे.

या स्पर्धेमधील स्पर्धक हा स्वतंत्रपणे काम करणारा डिजायनर, डिजाइन कंपनी, विद्यार्थी व सामान्य नागरिक यापैकी कोणीही राहू शकतो. सदर बोधचिन्ह आणि बोधवाक्य आंतरराष्ट्रीय दर्जाचे असावे ही अपेक्षा आहे. सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांमधून प्रथम पुरस्कार प्राप्त स्पर्धकाचा बोधचिन्ह आणि बोधवाक्य हे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर चे बोधचिन्ह आणि बोधवाक्य म्हणून निवडण्यात येईल. अंतिम निर्णय हा तज्ञ समितीचा राहील, याची नोंद घेण्यात यावी.

स्पर्धकांनी तयार केलेला बोध चिन्ह व बोध वाक्य PDF आणि CDR स्वरूपात त्यांचे संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक व ई-मेल सह mahajyotilogo@gmail.com या e-mail id वर पाठवावी. अंतिम दिनांक: 18/12/2020 (सायंकाळी 5 वाजेपर्यंत) अधिक माहितीकरीता 9823049835 या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा.

कार्यालयीन पत्ता:- महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, 3 रा माळा, ए-विंग, शासकीय औद्योगिक संस्था (ITI) समोर, दिक्षाभूमी रोड, श्रध्दानंदपेठ, नागपूर-440022.कडून