महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

एम.फील ते पीएच.डी रुजू अहवाल कागदपत्रे पाठविण्याबाबत

प्रिय अधिछात्रवृत्तीधारक,
विषय :- एम.फील ते पीएच.डी रुजू अहवाल कागदपत्रे पाठविण्याबाबत…
संदर्भ:- महाज्योती संचालक मंडळाची बैठक दिनांक 29 सप्टेंबर 2022
महाज्योती संस्थें अंतर्गत आपली “महात्मा ज्योतिबा फुले एम.फिल.संशोधन अधिछात्रवृत्ती- 2021” एम.फील करिता आपली निवड करण्यात आलेली होती. त्या अनुषंगाने आपणास महाज्योतीच्या अधिछात्रवृत्तीसाठी उपरोक्त नमूद संदर्भ अन्वये एम.फील ते पीएच.डी करिता अभ्यासक्रम पुढे सुरु ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
आपण या अनुषंगाने पुढील जास्तीत जास्त 3 वर्षाच्या कालावधीकरिता Ph.D. करण्याकरिता आपल्या विद्यापीठात नोंदणी करावी, त्या करिता पुढील कागदपत्रे Annexure-I (Joining Report) मूळ प्रत, कायम पीएच.डी नोंदणी पत्र (Ph.D Confirmation Letter) एक Xerox, संशोधन रूपरेषा (Synopsis) मार्गदर्शक यांच्या स्वाक्षरीने या कागदपत्रांची हार्ड कॉपी टपालाने महाज्योती कार्यालयास तात्काळ पाठवावे. महाज्योतीकडे सदर कागदपत्रे मिळाल्यानंतर उपरोक्त अधिछात्रवृत्तीबाबत आपणास पुरस्कार पत्र (Award Letter) देण्याची पुढील कार्यवाही करता येऊ शकेल, म्हणून प्राधान्याने उपरोक्त पूर्तता करावी.

सूचना-
1) पीएच.डी नोंदणी दिनांक / रुजू दिनांक चुकवू नये.
2) सदर रिपोर्ट वर कोणत्याही प्रकारची खाडाखोड किंवा टीप/नोट लिहू नये तसेच व्हाईटनरचा वापर होता कामा नये अन्यथा रिपोर्ट ग्राह्य धरला जाणार नाही.