1200px-Emblem_of_India.svg

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

प्रस्तावना

समाताधिष्टीत आधुनिक भारतीय समाज निर्मितीकरीता थोर महापुरुषांनी आपले आयुष्य वेचले. महात्मा ज्योतीबा फुले हे या समाजक्रांतीचे अग्रदुत होत. समता, न्याय आणि बंधुता या त्रितत्वावर आधारित आधुनिक समाज स्थापने करीता त्यांनी स्वतःच्या घरुनंच समाजक्रांतीचे रण फुुुंकले. विषमातावादी आणि परंपरावादी निष्क्रिय भारतीय समाजास समतामूलक तत्वांनी आणि विचारांनी तेजोमय केले. स्त्रिशिक्षण, अस्पृशांना शिक्षण, बालविवाह प्रतिबंधक, विधवा विवाह, शेतीसुधारणा, अनाथाश्रम, भृणहत्या प्रतिबंध, विधवा केषवपन बंदी इत्यादी विविध सामाजिक क्षे़त्रात त्यांनी क्रांतीकारी कार्य केले. एवढेच नाही तर सत्यशोधक समाजाची स्थापना करुन मानवतावादी नवसमाजाची मुहूर्तपेढ रोवली आणि आधुनिक पुरोगामी महाराष्ट्राचे जनक ठरले. महात्मा ज्योतीबा फुले यांचे आधुनिक समाजाचे स्वप्न पूर्णत्वास नेण्याचा प्रण महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. त्याकरीता इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग या कमकुवत घटकांच्या सर्वसमावेषक सर्वांगीण शाश्वत विकासाकरीता “महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था” (महाज्योती) या स्वायत्त संस्थेची स्थापना ८ ऑगस्ट २०१९ ला करण्यात आली. ही संस्था महाराष्ट्रातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग या घटकांतील सामाजिक, शैेेेेेक्षणिक, आर्थिक विकास, संशोधन, रोजगारभिमुकता वृध्दी, कौशल्य विकास, स्वयंरोजगार, ग्रामीण विकास, शेती विकास, व्यक्तिमत्व विकास , स्पर्धात्मकता विकास, सामाजिक ऐक्य व सलोखा आणि तत्सम क्षेत्रांमध्ये विविध उपक्रम राबवून आधुनिक समताधिष्ठित समाज निर्मिती करिता स्वतःस समर्पित करण्यास कटिबद्ध आहे.

कार्यक्षेत्र व घटक

  • कृषी संशोधन, मूल्यांकन, कौशल्य विकास प्रशिक्षण आणि रोजगार क्षमता वाढवणे.
  •  स्वयंरोजगार, उद्योजकता, कृषी औद्योगिक युनिटसह औद्योगिक एककांची स्थापना आणि विकास करणे.
  • डेटा बँका, ग्रंथालयांची स्थापना (विकास व देखभाल करणे), विविध सर्वेक्षण करणे.
  • विद्यार्थी, विद्वान, उद्योजक, शेतकरी आणि महिलांच्या वंचित घटकांसाठी कृषी आणि सहकारी संशोधन,मार्गदर्शन व सल्ला केंद्र.
  • विविध स्पर्धात्मक परीक्षा, करिअरच्या विकासासाठी प्रशिक्षण, कोचिंग इत्यादीं.
  • विविध क्षेत्रातील ज्ञान, अभ्यास व समन्वय मंडळे.
  • लक्ष्य गटांची सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी पुढाकार.
  •  शैक्षणिक शिष्यवृत्ती, फेलोशिप इ. संस्था आणि अनुदान या मार्फत ध्येयपुर्ती करणे.

Media Gallery

Photo Gallery

Video Gallery