महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

कागदपत्रांची पडताळणी वेळेत करून घेणेबाबत.(स्मरणपत्र)

परिपत्रक

महाज्योतीच्या PhD Fellowship 2022 करिता अर्ज केलेल्या उमेदवारांना कळविण्यात येते की, दि.27/08/2022 च्या परिपत्रकान्वये दि.01/09/2022 ते दि.15/09/2022 या कालावधी दरम्यान मूळ प्रमाणपत्र तसेच कागदपत्रे पडताळणी करून घेण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या होत्या. ज्या उमेदवारांनी अद्याप मूळ कागदपत्र/प्रमाणपत्र पडताळणी करून घेतलेली नाही अश्या उमेदवारांनी दि.15/09/2022 पर्यंत पडताळणी करून घ्यावी. जे उमेदवार मूळ कागदपत्र/प्रमाणपत्र पडताळणी करून घेणार नाहीत अश्या उमेदवारांचा मूळ अर्ज बाद अथवा रद्द ठरविण्यात येईल याची नोंद घ्यावी.

प्रकल्प व्यवस्थापक
महाज्योती,नागपूर