महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )

यु.पी.एस.सी 2023 पूर्व प्रशिक्षणाकरिता निवड परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी

युपीएससी परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता निवड परीक्षेसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की,
१) इंग्रजी व मराठी दोन्ही माध्यमासाठी एकच परीक्षा होणार आहे.
२) परीक्षा देत असताना ऑनलाईन परीक्षेच्या आधी परीक्षा सुरु होण्यापूर्वी उपलब्ध होणाऱ्या स्क्रीनवर आपल्याला इंग्रजी व मराठी माध्यम प्रशिक्षण या माध्यमाकरिता प्राधान्य देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. (उदा.इंग्रजी माध्यमाचे प्रशिक्षण घ्यावयाचे असल्यास त्यास इंग्रजी माध्यम प्रशिक्षण : १ क्रमांक व मराठी माध्यम प्रशिक्षण : २ क्रमांक असावा द्यावा)
३) उपलब्ध जागा, संवर्ग निहाय आरक्षणानुसार मेरीट यादी लावण्यात येणार आहे त्यात आपण दिलेल्या प्राधान्यानुसार प्रशिक्षणासाठी आपली निवड करण्यात येईल.
४) त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्या प्रकारचा संभ्रम मनात ठेवू नये.