Mahatma Jyotiba Phule Research & Training Institute
(MAHAJYOTI)

(An Autonomous Institute of The Other Backward Class Bahujan Welfare Department, Govt. of Maharashtra)
Total Visitors – 

महाज्योती मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती

  • प्रशिक्षणाचे स्वरूप : संघ लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेतील पूर्व, मुख्य व व्यक्तिमत्व चाचणीचे ११ महिने प्रशिक्षण हे दिल्ली व महाराष्ट्र येथील नामांकित संस्थांमध्ये देण्यात येते.
  • लाभाचे स्वरूप :
  1. मोफत प्रशिक्षण
  2. आकस्मिक निधी : एकवेळ रु.१८,०००/-
  3. विद्यावेतन: दरमाह ७५% हजेरी असल्यास रु.१3,०००/- विद्यावेतन
  4. प्रवास खर्च : दिल्ली येथील प्रशिक्षणाकरिता रु.१०,०००/-
  • पात्रता निकष :
  1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमीलेअर गटातील असावा.
  2. उमेदवाराने पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
  3. वयाची अट : २१ ते ३3 वर्षे , दिव्यांगाकरिता : ३5 वर्षे
  • अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
  1. ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड
  2. जात प्रमाणपत्र
  3. वैध नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र
  4. आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
    प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:
  • प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
  • प्राप्त अर्जांची छाननी करून उमेदवारांची निवड परीक्षा घेण्यात येते.
  • निवड परीक्षेमध्ये प्राप्त गुणांकानुसार व सामाजिक प्रवर्ग टक्केवारी नुसार उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येते.
  • प्रशिक्षणाचे स्वरूप : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेतील पूर्व, मुख्य व व्यक्तिमत्व चाचणीचे ११ महिने प्रशिक्षण नामांकित संस्थांमध्ये देण्यात येते.
लाभाचे स्वरूप :
  1. मोफत प्रशिक्षण
  2. विद्यावेतन: दरमाह ७५% हजेरी असल्यास रु.१०,०००/-
  3. आकस्मिक निधी : एकवेळ रु.१२,०००/-
पात्रता निकष :
  1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा.
  2. उमेदवार हा नॉन क्रिमीलेअर गटातील असावा.
  3. उमेदवाराने पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
  4. वयाची अट : १९ ते ४३ वर्षे , दिव्यांगाकरिता : ४५ वर्षे
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
  1. ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड
  2. जात प्रमाणपत्र
  3. वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
  4. आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
    प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:
  • प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
  • प्राप्त अर्जांची छाननी करून उमेदवारांची निवड परीक्षा घेण्यात येऊन अंतिम निवड करण्यात येते.
  • प्रशिक्षणाचे स्वरूप : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात येणाऱ्या संयुक्त गट ब व क परीक्षेतील पूर्व, मुख्य परीक्षेचे ६ महिने प्रशिक्षण नामांकित संस्थांमध्ये देण्यात येते.

  • लाभाचे स्वरूप :
  1. मोफत प्रशिक्षण
  2. विद्यावेतन: दरमाह ७५% हजेरी असल्यास रु.१०,०००/-
  3. आकस्मिक निधी : एकवेळ रु.१२,०००/-
  • पात्रता निकष :
  1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमीलेअर गटातील असावा.
  2. उमेदवाराने पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
  3. वयाची अट : १९ ते ४1 वर्षे , दिव्यांगाकरिता : ४3 वर्षे
  • अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
  1. ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड
  2. जात प्रमाणपत्र
  3. वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
  4. आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
    प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:
  • प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
  • प्राप्त अर्जांची छाननी करून उमेदवारांची निवड परीक्षा घेण्यात येते.
निवड परीक्षेमध्ये प्राप्त गुणांकानुसार व सामाजिक प्रवर्ग टक्केवारी नुसार उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येते
  • प्रशिक्षणाचे स्वरूप : Staff Selection Commission Combined Graduate Level
(SSC-CGL) परीक्षेतील पूर्व, मुख्य परीक्षेचे ६ महिने प्रशिक्षण हे नामांकित संस्थांमध्ये देण्यात येते.
  • लाभाचे स्वरूप :
  1. मोफत प्रशिक्षण
  2. विद्यावेतन: दरमाह ७५% हजेरी असल्यास रु.१०,०००/-
  3. आकस्मिक निधी : एकवेळ रु.१२,०००/-
  • पात्रता निकष :
  1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमीलेअर गटातील असावा.
  2. उमेदवाराने पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
  3. वयाची अट : १८ ते ३० वर्षे , दिव्यांगाकरिता : 40 वर्षे
  • अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
  1. ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड
  2. जात प्रमाणपत्र
  3. वैध नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र
  4. आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
    प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:
  • प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
  • प्राप्त अर्जांची छाननी करून उमेदवारांची निवड परीक्षा घेण्यात येते.
  • निवड परीक्षेमध्ये प्राप्त गुणांकानुसार व सामाजिक प्रवर्ग टक्केवारी नुसार उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येते.
  • प्रशिक्षणाचे स्वरूप : IBPS बँक परीक्षेतील पूर्व, मुख्य परीक्षेचे ६ महिने प्रशिक्षण हे नामांकित संस्थांमध्ये देण्यात येते.

  • लाभाचे स्वरूप :
  1. मोफत प्रशिक्षण
  2. विद्यावेतन: दरमाह ७५% हजेरी असल्यास रु.10,०००/-
  3. आकस्मिक निधी : एकवेळ रु.१२,०००/-
  • पात्रता निकष :
  1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमीलेअर गटातील असावा.
  2. उमेदवाराने पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
  3. वयाची अट : २० ते २८ वर्षे , दिव्यांगाकरिता : ३८ वर्षे
  • अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
  1. ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड
  2. जात प्रमाणपत्र
  3. वैध नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र
  4. आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
    प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:
  • प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
  • प्राप्त अर्जांची छाननी करून उमेदवारांची निवड परीक्षा येते.
निवड परीक्षेमध्ये प्राप्त गुणांकानुसार व सामाजिक प्रवर्ग टक्केवारी नुसार उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येते.
  • प्रशिक्षणाचे स्वरूप : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी सेवा परीक्षेतील पूर्व, मुख्य व व्यक्तिमत्व चाचणीचे ११ महिने प्रशिक्षण नामांकित संस्थांमध्ये देण्यात येते.

  • लाभाचे स्वरूप :
  1. मोफत प्रशिक्षण
  2. विद्यावेतन: दरमाह ७५% हजेरी असल्यास रु.१०,०००/-
  3. आकस्मिक निधी : एकवेळ रु.१२,०००/-
  • पात्रता निकष :
  1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमीलेअर गटातील असावा.
  2. उमेदवाराने पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
  3. वयाची अट : १९ ते ४1 वर्षे , दिव्यांगाकरिता : ४3 वर्षे
  • अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
  1. ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड
  2. जात प्रमाणपत्र
  3. वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
  4. आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
    प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:
  • प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
  • प्राप्त अर्जांची छाननी करून उमेदवारांची निवड परीक्षा घेण्यात येते.
निवड परीक्षेमध्ये प्राप्त गुणांकानुसार व सामाजिक प्रवर्ग टक्केवारी नुसार उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येते.
  • प्रशिक्षणाचे स्वरूप : यु.जी.सी./सी.एस.आय.आर मार्फत घेण्यात येणाऱ्या नेट तसेच सेट परीक्षेचे ६ महिने प्रशिक्षण हे पुणे येथील नामांकित संस्थांमध्ये देण्यात येते.

  • लाभाचे स्वरूप :
  1. मोफत प्रशिक्षण
  2. विद्यावेतन: दरमाह ७५% हजेरी असल्यास रु.१०,०००/-
  3. आकस्मिक निधी : एकवेळ रु.१२,०००/-
  • पात्रता निकष :
  1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमी लेअर गटातील असावा.
  2. उमेदवाराने पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
  3. वयोमर्यादा नाही.
  • अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
  1. ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड
  2. जात प्रमाणपत्र
  3. वैध नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र
  4. आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
    प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:
  • प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
  • प्राप्त अर्जांची छाननी करून उमेदवारांची निवड परीक्षा घेण्यात येऊन अंतिम निवड करण्यात येते.
निवड परीक्षेमध्ये प्राप्त गुणांकानुसार व सामाजिक प्रवर्ग टक्केवारी नुसार उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येते.
  • प्रशिक्षणाचे स्वरूप : विविध शैक्षणिक संस्थांमार्फत घेण्यात येणाऱ्या MBA-CAT, CET परीक्षेचे ६ महिने प्रशिक्षण हे पुणे येथील नामांकित संस्थांमध्ये देण्यात येते.

  • लाभाचे स्वरूप :
  1. मोफत प्रशिक्षण
  2. विद्यावेतन: दरमाह ७५% हजेरी असल्यास रु.१०,०००/-
  3. आकस्मिक निधी : एकवेळ रु.१२,०००/-
  • पात्रता निकष :
  1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमी लेअर गटातील असावा.
  2. उमेदवाराने पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
  • अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
  1. ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड
  2. जात प्रमाणपत्र
  3. वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
  4. आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
    प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:
  • प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
  • प्राप्त अर्जांची छाननी करून उमेदवारांची निवड परीक्षा घेण्यात येऊन अंतिम निवड करण्यात येते.
  • निवड परीक्षेमध्ये प्राप्त गुणांकानुसार व सामाजिक प्रवर्ग टक्केवारी नुसार उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येते.
  • प्रशिक्षणाचे स्वरूप : भारतीय सैन्य दल, केंद्रीय पोलीस सेवा यांचेमार्फत घेण्यात येणाऱ्या मिलिटरी भरती परीक्षेचे ६ महिने प्रशिक्षण हे पुणे येथील नामांकित संस्थांमध्ये देण्यात येते.

  • लाभाचे स्वरूप :
  1. मोफत प्रशिक्षण
  2. विद्यावेतन: दरमाह ७५% हजेरी असल्यास रु.१०,०००/-
  3. आकस्मिक निधी : एकवेळ रु.१२,०००/-
  • पात्रता निकष :
  1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमी लेअर गटातील असावा.
  2. उमेदवाराने 10 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
  3. किमान उंची १५७ से.मी. (पुरुषांकरिता), १५२ से.मी. (महिलांकरिता),
  4. छाती (फक्त पुरुषांकरिता): किमान ७७ से.मी. व दीर्घश्वास घेतल्यावर ८२ से.मी.
  5. वयाची अट : १७ ते 1९ वर्षे
  • अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
  1. ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड
  2. जात प्रमाणपत्र
  3. वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
  4. आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
  • प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:
  • प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
  • प्राप्त अर्जांची छाननी करून उमेदवारांची निवड परीक्षा घेण्यात येते.
निवड परीक्षेमध्ये प्राप्त गुणांकानुसार व सामाजिक प्रवर्ग टक्केवारी नुसार उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येते.
  • प्रशिक्षणाचे स्वरूप : अभियांत्रिकी तसेच वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात प्रवेश मिळण्यासाठी १८ महिने JEE/NEET/MHT-CET चे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येते.

  • लाभाचे स्वरूप :
  1. मोफत प्रशिक्षण
  2. विद्यार्थ्यांना मोफत Tablet
  3. प्रतिदिवस ६ जीबी इंटरनेट सेवा
  • पात्रता निकष :
  1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमी लेअर गटातील असावा.
  2. उमेदवाराने १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे शहरी भागातील विद्यार्थ्यांना किमान ७०% टक्के गुण असावेत तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना किमान ६०% टक्के गुण असावेत.
  3. विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा.
  • अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
  1. ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड
  2. जात प्रमाणपत्र
  3. वैध नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र
  4. आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
    प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:
  • प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
प्राप्त अर्जांची छाननी करून १० ला प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे व  संवर्गनिहाय तसेच समांतर आरक्षणानुसार उमेदवारांची निवड करण्यात येते
  • प्रशिक्षणाचे स्वरूप : वैमानिक क्षेत्रात प्रवेश मिळण्यासाठी १८ महिने नागपूर फ्लाईंग क्लब, नागपूर यांचेमार्फत प्रशिक्षण देण्यात येते.

  • लाभाचे स्वरूप :
  1. मोफत प्रशिक्षण
  2. विद्यावेतन: दरमाह ७५% हजेरी असल्यास रु.१०,०००/-
  • पात्रता निकष :
  1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमी लेअर गटातील असावा.
  2. उमेदवाराने १२ वी पर्यंतचे शिक्षण विज्ञान शाखेतून पूर्ण केलेले असावे तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना किमान ६०% टक्के गुण असावेत, शहरी भागातील विद्यार्थ्यांना किमान ६५% टक्के गुण असावेत.
  • अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
  1. ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड
  2. जात प्रमाणपत्र
  3. वैध नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र
  4. आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
  • प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:
  1. प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
  2. प्राप्त अर्जांची छाननी करून उमेदवारांची निवड परीक्षा घेण्यात येते.
  3. निवड परीक्षेमध्ये प्राप्त गुणांकानुसार व सामाजिक प्रवर्ग टक्केवारी नुसार उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येते.
  • प्रशिक्षणाचे स्वरूप : राष्ट्रीय कौशल्य विकास कॉर्पोरेशनने (NSDC) निश्चित केलेल्या निकषानुसार सेक्टर स्कील कौन्सिल, शासकीय प्रशिक्षण संस्था तसेच खाजगी प्रशिक्षण संस्था यांचे मार्फत विविध तांत्रिक तसेच सेवा क्षेत्रातील २ ते १२ महिन्यापर्यंतचे कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येते.

  • लाभाचे स्वरूप :
  • मोफत प्रशिक्षण
  • निवासी प्रशिक्षण असल्यास निवास व भोजनाची मोफत व्यवस्था.
  • प्रशिक्षणानंतर खाजगी कंपन्या तसेच आस्थापनांमध्ये रोजगाराची संधी.

  • पात्रता निकष :
  1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमी लेअर गटातील असावा.
  2. उमेदवाराला ज्या अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावयाचा आहे अश्या अभ्यासक्रमांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असावी.
  • अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
  1. ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड
  2. जात प्रमाणपत्र
  3. वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
  4. आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
  • योजनेचे स्वरूप : भारतातील यु.जी.सी.मान्यताप्राप्त विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, महाविद्यालयात पूर्ण वेळ पीएचडी करण्यासाठी महाज्योतीमार्फत जास्तीत जास्त ५ वर्षे अर्थसहाय्य करण्यात येते.
  • निर्धारित जागा : २००
  • अर्थसहाय्याचे स्वरूप :

Fellowship in Humanities, Social Sciences, Sciences Engineering & Technology

Ph.D.

@ Rs. 37,000/-p.m. for 1st & 2nd year

(MJPJRF)

@ Rs. 42,000/- p. m. for 3rd, 4th& 5th year subject to providing upgradation certificate.

(MJPSRF)

Contingency A,

@ Rs. 10000/- p.a. for initial 1st & 2nd year

Humanities & Social Sciences

@ Rs. 20500/- p.a. for 3rd, 4th, & 5th year

Contingency B

@ Rs. 12000/- p.a. for initial 1st & 2nd year

Sciences, Engg. & Technology

@ Rs. 25000/- p.a. for 3rd, 4th, & 5th year

Escorts / Reader assistance

@ Rs. 2000/- p.m. in case of physically handicapped & blind (दिव्यांगजन) candidates

For all disciplines

HRA

As per Govt. norms (10%, 20%, 30%)

For all disciplines

  • पात्रता निकष :
  1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमी लेअर गटातील असावा.
  2. उमेदवाराने भारतातील यु.जी.सी.मान्यताप्राप्त विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, महाविद्यालयात पूर्ण वेळ पीएचडी करण्यासाठी कायमस्वरूपी नोंदणी केलेली असावी.
  3. वयोमर्यादा : कमाल ४५ वर्षे.

  • अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
  1. ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड
  2. जात प्रमाणपत्र
  3. वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
  4. आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
  5. यु.जी.सी.मान्यताप्राप्त विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, महाविद्यालयात पूर्ण वेळ पीएचडी करण्यासाठी कायमस्वरूपी नोंदणी प्रमाणपत्र.
  • निवड पद्धती:
  1. प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.
  2. प्राप्त अर्जांची छाननी करून उमेदवारांची निवड परीक्षा घेण्यात येऊन अंतिम निवड करण्यात येते.

टीप : महात्मा ज्योतिबा संशोधन अधिछात्रवृत्ती करिता सविस्तर मार्गदर्शक सूचना या महाज्योतीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

अ क्र योजनेचे नाव अर्थसहाय्य रक्कम पात्रता निकष
UPSC नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेसाठी अर्थसहाय्य रु.२५,०००/- एकवेळ उमेदवार हा UPSC नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणीकरिता पात्र असावा.
UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षेसाठी अर्थसहाय्य रु.५०,०००/- एकवेळ उमेदवार हा UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा.
UPSC वनसेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेसाठी अर्थसहाय्य रु.२५,०००/- एकवेळ उमेदवार हा UPSC वनसेवा व्यक्तिमत्व चाचणीकरिता पात्र असावा.
UPSC वनसेवा मुख्य परीक्षेसाठी अर्थसहाय्य रु.५०,०००/- एकवेळ उमेदवार हा UPSC वनसेवा मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा.
MPSC राज्यसेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेसाठी अर्थसहाय्य रु.10000/- एकवेळ उमेदवार हा MPSC राज्यसेवा व्यक्तिमत्व चाचणी करिता पात्र असावा.
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी अर्थसहाय्य रु.१५,०००/- एकवेळ उमेदवार हा MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा.
MPSC महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा अर्थसहाय्य रु.१०,०००/- एकवेळ उमेदवार हा MPSC दुय्यम सेवा मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा.
MPSC महाराष्ट्र दुय्यम सेवा मुलाखत अर्थसहाय्य रु.५,०००/- एकवेळ उमेदवार हा MPSC दुय्यम सेवा मुलाखत परीक्षेकरिता पात्र असावा.
MPSC तांत्रिक सेवा स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा अर्थसहाय्य रु.१५,०००/- एकवेळ उमेदवार हा MPSC तांत्रिक सेवा स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा.
१० MPSC तांत्रिक सेवा मॅकॅनिकल अभियांत्रिकी मुख्य परीक्षा अर्थसहाय्य रु.१५,०००/- एकवेळ उमेदवार हा तांत्रिक सेवा मॅकॅनिकल अभियांत्रिकी मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा.
११ MPSC तांत्रिक सेवा (कृषी सेवा) मुख्य परीक्षा अर्थसहाय्य रु.१५,०००/- एकवेळ उमेदवार हा MPSC तांत्रिक सेवा (कृषी सेवा) मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा.
१२ MPSC तांत्रिक सेवा ईलेक्ट्रीकल अभियांत्रिकी मुख्य परीक्षा अर्थसहाय्य रु.१५,०००/- एकवेळ उमेदवार हा MPSC तांत्रिक सेवा ईलेक्ट्रीकल अभियांत्रिकी मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा.
१३ MPSC तांत्रिक सेवा (वन सेवा) मुख्य परीक्षेकरिता अर्थसहाय्य रु.१५,०००/- एकवेळ उमेदवार हा MPSC तांत्रिक सेवा (वन सेवा) मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा.
१४ MPSC न्यायिक सेवा मुलाखत अर्थसहाय्य रु.१०,०००/- एकवेळ उमेदवार हा MPSC न्यायिक सेवा मुलाखत परीक्षेकरिता पात्र असावा.
१५ MPSC न्यायिक सेवा मुख्य परीक्षा अर्थसहाय्य रु.१५,०००/- एकवेळ उमेदवार हा MPSC न्यायिक सेवा मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा.
१७ UPSC CAPF मुलाखत परीक्षा अर्थसहाय्य रु.२५,०००/- एकवेळ उमेदवार हा UPSC CAPF मुलाखत परीक्षेकरिता पात्र असावा.